व.
पु. म्हणतात, "आयुष्यात एक क्षण भाळण्याचा बाकी सारे सांभाळण्याचे" किती
खरे आहे!! आयुष्यभर आपण सारेच्या सारे एका स्ट्रोक साठी धडपडत असतो. तो आयुष्यात
आधी आला तर सारं आयुष्यच बदलून जातं आणि नंतर आला तर सारं आयुष्य संपून
जातं . एकच क्षण प्रचंड वेदनेचा असतो आणि तेवढाच एक क्षण प्रगल्भ वेदनेचाही. .
. ते प्रगल्भपण प्रचान्दातेच्या दडपणाखालीही उमगलं तर माणूस घडतो. . . प्रबुद्ध
होतो.
प्रसवाचा
एकाच क्षण मातेच आयुष्य बदलून जातो. नाकारताच येणार नाही उर्वरित क्षणांचं . . . त्या
वेळासाठीचं सहनशील असणं. enlightenment हि त्या एका परिपक्व क्षणापेक्षा ह्या
अनेक सहन कराव्या लागणाऱ्या असहनीय वाट पाहायला लावणाऱ्या पलांमध्ये जास्त आहे.
They are contributing a lot to that one and so that the one is precious . . .
most precious. . .