ऐसे मिटून जाऊ भृन्गास आत घेऊ
कोण्या जळातळाचा रे चल थांग लावू
कमला मनास पाहू चल पाशबद्ध होऊ
कोणी धरू शकेना ऐसे उडुनी जाऊ
चल रे अंत होऊ सांगून हृदगताला
निघूया चल प्रवासा थोडे फिरून येऊ
मी का तुला स्मरावे माझे मला कळेना
थोडा परस्परांचा रे ढवळून अंत पाहू
ऐसे नकोस पाहू हृदयास विद्ध करुनी
येणे आणिक जाणे कैसे कशास साहू
आरंभ तूच माझा अन्ता नकोस होऊ
चंद्रकोर नेत्रांची मिटण्या नकोस येऊ
-कौमुदी.
कोण्या जळातळाचा रे चल थांग लावू
कमला मनास पाहू चल पाशबद्ध होऊ
कोणी धरू शकेना ऐसे उडुनी जाऊ
चल रे अंत होऊ सांगून हृदगताला
निघूया चल प्रवासा थोडे फिरून येऊ
मी का तुला स्मरावे माझे मला कळेना
थोडा परस्परांचा रे ढवळून अंत पाहू
ऐसे नकोस पाहू हृदयास विद्ध करुनी
येणे आणिक जाणे कैसे कशास साहू
आरंभ तूच माझा अन्ता नकोस होऊ
चंद्रकोर नेत्रांची मिटण्या नकोस येऊ
-कौमुदी.
1 टिप्पणी:
"मी का तुला स्मरावे माझे मला कळेना
थोडा परस्परांचा रे ढवळून अंत पाहू "
kya baat!
टिप्पणी पोस्ट करा