तू निघून गेलास तरी कळ उठतेच काळजात (म्हणूनच त्याला काळीज म्हणत असावेत कदाचित) आहेस तू इथंच रोमारोमातून . . .अजूनही . . . खूप गढलेली असते कामात म्हणून तुझी आठवण होत नाही असं नाही. तुझ्यासाठीच आणि तुझ्यामुळेच तर आयुष्यातलं हरेक काम करते मी . . .
तुला पौर्णिमेत आभाळभर चंद्र पाहायचा होता आणि मी अजूनही अमावस्येतच लुप्त आहे. रात्रीच्या गर्भात जेव्हा पूर्णचंद्र अंकुरेल तेव्हा सारं जग स्वच्छ चांदण्यात न्हाऊन निघेल, त्यासाठीच तर मी सारा कृष्णपक्ष मोजते आहे. . .
अजूनही तुझ्या नावानं तरारतात डोळे आणि दोन आसव गालांवर उतरतात . . . मी त्यांना काळजात जिरवायला शिकले आहे आत्ता आत्ता . . ! आहे लक्षात माझ्या . . . पावसाळी आभाळातला झाकोळलेला चंद्र तुला कधीच आवडत नव्हता.
तू हसू घेऊन आलास आणि आसू होऊन गेलास . . . मी सुखी आहे रे त्या आसवांतसुद्धा. . . पुसत तू नसलास तरी ओघळतो तूच आहेस. . .
तू मला तुला विसरायला सांगून गेलास . . . कशी विसरू तुला? तुला विसरायचं म्हटलं तर माझी जमीन, वरच आभाळ, भोवतालची हवा, चंद्र-सूर्य तारे सारे विसरावे लागतील. मला माझे निश्वासही थांबवावे लागतील . . . देहाला अजूनही तुझ्याच नजरेची झुंबरं लटकताहेत. . इतका प्रकाश आहे . . . मी उजळले आहे. . .
आठवतोय तुला? माझ्या पदरानं मी तुझ्या कपाळावरचा टिपलेला घाम . . . माझा पदर अजूनही ओला. . . तुझ्या अस्तित्वाचा गंध घेऊन कस्तुरीला दरवळ आहे . . . कपाळावर टेकलेले तुझे ओठ हटलेच नाहीत अजून . . . अजूनही माझ्या केसांवर तुझेच हात फिरताहेत . . .
खूप भुकेजला होतास तू एकदा . . . माझ्या हाताने तुला घास भरवल्यानंतर तुझी तृप्त नजर . . . रक्तचंदनाचं काम करते आहे . . .
कानात तुझाच स्वर रुंजी घालतोय आणि आता . . . आता तर तू माझ्याच ओठांनी बोलतो आहेस . . .
तुला विसरायचं म्हणजे हे पंचप्राण टाकावे लागतील . . . बघ ना. . . तू म्हणजे तू आणि मी म्हणजेही तू. तुझ्यातून तुला कसं वजा करता येईल? मी असते तर विसरले असते कदाचित! !
You are a change for me; and it is drastic. Just because, you changed me, I met myself. You "for whom and by whom" I am What I am तुला पौर्णिमेत आभाळभर चंद्र पाहायचा होता आणि मी अजूनही अमावस्येतच लुप्त आहे. रात्रीच्या गर्भात जेव्हा पूर्णचंद्र अंकुरेल तेव्हा सारं जग स्वच्छ चांदण्यात न्हाऊन निघेल, त्यासाठीच तर मी सारा कृष्णपक्ष मोजते आहे. . .
अजूनही तुझ्या नावानं तरारतात डोळे आणि दोन आसव गालांवर उतरतात . . . मी त्यांना काळजात जिरवायला शिकले आहे आत्ता आत्ता . . ! आहे लक्षात माझ्या . . . पावसाळी आभाळातला झाकोळलेला चंद्र तुला कधीच आवडत नव्हता.
तू हसू घेऊन आलास आणि आसू होऊन गेलास . . . मी सुखी आहे रे त्या आसवांतसुद्धा. . . पुसत तू नसलास तरी ओघळतो तूच आहेस. . .
तू मला तुला विसरायला सांगून गेलास . . . कशी विसरू तुला? तुला विसरायचं म्हटलं तर माझी जमीन, वरच आभाळ, भोवतालची हवा, चंद्र-सूर्य तारे सारे विसरावे लागतील. मला माझे निश्वासही थांबवावे लागतील . . . देहाला अजूनही तुझ्याच नजरेची झुंबरं लटकताहेत. . इतका प्रकाश आहे . . . मी उजळले आहे. . .
आठवतोय तुला? माझ्या पदरानं मी तुझ्या कपाळावरचा टिपलेला घाम . . . माझा पदर अजूनही ओला. . . तुझ्या अस्तित्वाचा गंध घेऊन कस्तुरीला दरवळ आहे . . . कपाळावर टेकलेले तुझे ओठ हटलेच नाहीत अजून . . . अजूनही माझ्या केसांवर तुझेच हात फिरताहेत . . .
खूप भुकेजला होतास तू एकदा . . . माझ्या हाताने तुला घास भरवल्यानंतर तुझी तृप्त नजर . . . रक्तचंदनाचं काम करते आहे . . .
कानात तुझाच स्वर रुंजी घालतोय आणि आता . . . आता तर तू माझ्याच ओठांनी बोलतो आहेस . . .
तुला विसरायचं म्हणजे हे पंचप्राण टाकावे लागतील . . . बघ ना. . . तू म्हणजे तू आणि मी म्हणजेही तू. तुझ्यातून तुला कसं वजा करता येईल? मी असते तर विसरले असते कदाचित! !
Thanks D
कौमुदी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा