खंत आहे,
मला नाही ओळखता आला
तुझा आपले-तुपलेपणा. .
ठाऊक . .
तू परकाच आहेस माझ्यासाठी
मग हि आगळी रहस्ये
कशी उलगडली तुला?
मी मनाचा मोर तुझ्या हाती देऊन
मयूराक्षी झालेय खरी
पण मयुरपंख होण्याचे
नशीब नाहीच माझे
असेल तुझ्या जगण्याने
माझ्या काळजाचा ठाव घेतलेला
म्हणून जखम तूच बांधावी
हा न्याय कुठे?
तुला आपलेपणाचा उमाळा यावा
हा खरा हृदरोग माझा
तुझ्या दयेने तुला
खरेच. . परका करून टाकले
कौमुदी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा